DhammaVivahTM
Back to Blog

25 Oct 2026

धम्मविवाह - दोन कुटुंबाचा उत्कर्ष

धम्मविवाह - दोन कुटुंबाचा उत्कर्ष

भारतीय समाजव्यवस्थेमध्ये विवाहाला महत्त्वाचे स्थान आहे. विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तीचे मिलन नसून दोन कुटुंबाचे नाते जोडणारा आणि नव्या ज्ञीवनाची सुरुवात करणारा संस्कार आहे. तथापी, विवाहामध्ये समानता, बंधुता, स्वातंत्र्य, परस्पर आदर आणि मानवतेला महत्त्व दिले तर, तो केवळ कौटुंबिक सोहळा न राहता सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन बनतो. तथागताच्या विचारांवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या समतावादी तत्वज्ञानावर आधारित धम्मविवाह हा दोन व्यक्तीसह दोन कुटुंबाच्या उत्कर्षाचा मार्ग आहे.

धम्मविवाहाची संकल्पना

धम्मविवाह म्हणजे अंधश्रद्धा, कर्मकाड, जातिभेद आणि अनावश्यक खर्च यांना बाजूला ठेवून विवेक, समता, प्रेम, करुणा, जिव्हाळा, मैत्री आणि नैतिक मुल्यांच्या आधारावर केला जाणारा विवाह. धम्म विवाहामध्ये भगवान बुद्धानी सांगितलेल्या पंचशिलाच्या तत्वांना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले स्वातंत्र्य, समता व बंधुता मुल्यांना महत्त्व दिले जाते.

धम्मविवाहाचा मुख्य उद्देश केवळ विवाह बंधन निर्माण करने नसून, नवदाम्पत्याला जबाबदार विवेकी, विश्वासाचे, धम्म संस्काराचे, कौटुंबिक समानता, लहान मोठ्याचा सन्मान राखून सुखी, शांततापूर्ण आनंददायी व मैत्रिपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणे हा आहे.

दोन व्यक्तिंच्या नव्या जीवनाची सुरुवात

विवाहानंतर पती-पत्नी दोघेही आपल्या जीवनातील नवीन प्रवास सुरु करतात. या प्रवासात एकमेकांच्या भावना समजून घेणे, विचारांचा आदर करने, संकटात साथ देणे, सुख-दुःखात एकत्र राहने, दोघेही पती पत्नी यांनी उत्कर्ष साधने आवश्यक असते.

धम्म विवाहामध्ये पती व पत्नी यांच्यात कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. दोघांनाही समान अधिकार, समान संधी व सामान सन्मान मिळाला पाहिजे. परस्पर विश्वास, सम्यक संवाद, मैत्री सहकार्य व जिव्हाळा यांच्या आधार उभे राहिलेले वैवाहिक जीवन अधिक आनंदी, स्थिर व मैत्रिपूर्ण असते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा पती पत्नीचे नाते हे मित्रत्वाचे असले पाहीजे असेच म्हटले आहे.

दोन कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक उत्कर्ष

धम्मविवाहाचे महत्त्वाचे वैशिष्टये म्हणजे तो दोन कुटुंबांना समानता, परस्पर विश्वास, सम्यक संवाद व सहकार्याच्या धाग्याने जोडतो. विवाहामुळे दोन कुटुंबामध्ये प्रेम, आपुलकी, सहकार्य, परस्पर विश्वास जिव्हाळा सम्यक संवाद व सम्यक मैत्रिचे संबंध निर्माण होतात.

विवाहामध्ये हुंडा, प्रतिष्ठेची स्पर्धा आणि दिखाऊपणा टाळल्यास दोन्ही कुटुंबाची आर्थिक बचत तर होतेच याशिवाय शारीरीक व मानसिक रित्या दोन्ही कुटुंब अधिक सक्षम होऊन सगळीकडे आनंददायी व प्रफ्फुलित वातावरण निर्माण होण्यास मदत होते. त्याच प्रमाणे कर्मकांड, यज्ञ-याग, टाकाऊ धार्मिक प्रथा परंपरा यांचा त्याग केल्यामुळे विवाहाकडे धम्म संस्कार, वैज्ञानिक दृष्टिकोन, नैतिकता, नितीमूल्ये या मूल्यांद्वारे सामाजिक विकास साधण्यास आपसूकच मदत होते.

धम्मविवाहामुळे दोन्ही कुटुंबामध्ये शिक्षण, आरोग्य, वैज्ञानिक दृष्टीकोन आर्थिक नियोजन, सामाजिक प्रगती, मानवतावाद व संवैधानिक मूल्ये यासारख्या विषयावर सकारात्मक विचारांची देवानघेवान होऊ शकते. ज्यामुळे पुढच्या पिढीमध्ये ही गुण वैशिष्ट्ये तसेच बौध्द, धम्म व संघ संस्कृती रुजविण्यास मोलाची मदत होऊ शकते. अशा प्रकारे विवाह हा कौटुंबिक सबंध न राहता दोन्ही कुटुंबाच्या प्रगतीचा आधार बनतो

स्त्री-पुरुष समानता व स्त्रीचा सन्मान

समाजाच्या प्रगती साठी स्त्री आणि पुरुष यांना समान अधिकार मिळणे आवश्यक आहे. स्त्री ही केवळ एखादया कुटुंबाची जबाबदारी नसून ती स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली बुध्दिमान आणि कर्तुत्ववान व्यक्ती आहे. धम्म विवाहामध्ये पत्नीच्या शिक्षणाला, करिअरला मतांना आणि स्वप्नांना स्वप्नांना महत्त्व दिले जाते. त्याचप्रमाणे पतीनेही घरातील जबाबदाऱ्या पार पाडने, पत्नीला सहकार्य करने आणि तिच्या स्वाभिमानाचा आदर करने आवश्यक आहे.

ज्या कुटुंबात स्त्रीला समान स्थान मिळते त्या कुटुबातील मुलांनाही समता आणि सन्मानाची शिकवण मिळते. त्यामुळे पुढील पिढी अधिक संवेदनशील, विवेकी आणि जबाबदार बनते.

अंधश्रद्धा आणि अनावश्यक खर्चाला फाटा

आज अनेक विवाहसोहळ्यांमध्ये सामाजिक प्रतिष्ठेसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जातो. कर्ज काढून विवाह करने, हुंड्याची अपेक्षा ठेवणे किंवा विविध कर्मकांडावर अनावश्यक खर्च करने यामूळ कुटुंबावर आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो. धम्म विवाह साधेपणा विवेक आणि सामाजिक जबाबदारी यांचा संदेश देतो. विवाहाचा खरा आनंद महागड्या सजावटीत किंवा मोठ्या मोठ्या मेजवानीत नसून दोन व्यक्तींच्या आनंदात व कुटुबाच्या प्रेमात असतो. विवाह साधेपनाने साजरा करून वाचलेला पैसा, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, गरीब कुटुंबाच्या मदती साठी किंवा समाजोपयोगी कार्यासाठी वापरता येऊ शकतो. त्यामुळे धम्मविवाहाला सामाजिक परिवर्तनाची जोड मिळते

भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेबांचे आंबेडकरांचे विचार

भगवान गौतम बुद्धांनी मानवाला करुणा, मैत्री, प्रज्ञा आणि सदाचाराचा मार्गदाखविला. त्यांनी द्वेषा ऐवजी प्रेम, अज्ञानाऐवजी ज्ञान, आणि दुःखूमुक्ती साठी विवेकपूर्ण आचरण यांना महत्त्व दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकरानी समाजाला स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मुल्यांची शिकवण दिली. त्यांनी शिक्षणाला प्रगतीचे प्रभावी साधन मानले व सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष केला. या विचारांचा स्वीकार करुन केलेला धम्मविवाह नवदाम्पत्याला केवळ संसार करण्याची प्रेरणा देत नाही तर समताधिष्ठीत समाज निर्मितीची जबाबदारीही समजावून सांगतो

पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा पाया

कुटुंब हे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचे पहिले केंद्र आहे. आई-वडीलाचे वर्तन, विचार आणि जिवनमुल्ये मुलांच्या मनावर खोल परिणाम करतात. ज्या घरात समानता, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोण, करुणा, जिव्हाळा, मैत्रीभाव आणि पररचर आदर यांना महत्त्व दिले जाते, त्या घरातील मुलांमध्ये चांगले संस्कार विकसित होण्यास मदत होते. धम्मविवाहातून निर्माण होणारे सुसंवादी कुटुंब पुढील पिढीला जातीभेद, अंधश्रद्धा आणि भेदभावापासून दूर राहण्याची प्रेरणा देते. अशा कुटुंबामुळे, समताधीष्ठीत आणि प्रगत समाजाची निर्मिती होण्यास हातभार लागतो.

धम्मविवाह: सामाजिक परिवर्तनाची चळवळ

धम्मविवाह हा केवळ दोन व्यक्तिच्या विवाहाचा विषय नाही, तर समाजातील अनिष्ठ प्रथा बदलण्याची एक सकारात्मक संधी आहे. साधेपणा, समानता आणि विवेक यांच्या आधारे विवाह केल्यास समाजासमोर एक आदर्श निमांग होतो.

धम्मविवाहाच्या माध्यमातून हुंडा मुक्त समाज, स्त्री-पुरुष समानता, शिक्षणाचा प्रसार, आर्थिक बचत आणि सामाजिक बंधुता यांना प्रोत्साहन देता येते. प्रत्येक कुटुंबाने विवाहाकडे केवळ प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारी म्हणून पाहिले तर समाजाच्या प्रगतीला नवी दिशा मिळते.

धम्मविवाह म्हणजे दोन व्यक्तिंचे मिलन, दोन कुटुंबाचे एकत्रीकरण आणि समताधिष्ठीत समाज-निर्मितीचा संकल्प होय. प्रेम, विश्वास, समानता, करुणा, प्रज्ञा आणि या मूल्यांवर आधारित वैवाहिक जीवन दोन्ही कुटुंबांना मानसिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध करू शकते. भगवान बुद्धांच्या प्रज्ञेचा आणि डॉ बाबासाहेब आबेड्करांच्या समतेच्या विचारांचा स्वीकार करून प्रत्येकाने विवेकपूर्ण, साधा आणि समानतेवर आधारित विवाह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे

शेवटी एवढेच म्हणता येईल की

धम्मविवाह हा केवळ दोन मनांचा संगम नाही, तर दोन कुटुंबाच्या उत्कर्षाचा, नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा भविष्याचा आणि समतामुलक समाजाच्या निर्मितीचा मंगलमय मार्ग आहे

जय भीम नमो बुद्धाय !

श्री. राज गायकवाड
जीएसटी अधिकारी | महाराष्ट्र शासन
📞 +91 80552 03036

Keep reading

More from the Blog

See all posts →